Farming tools Names in Marathi | शेतीच्या अवजारांची मराठीत नावे

Farming tools Names in Marathi” शेतीच्या अवजारांची मराठीत नावे आणि उपयोग, आपण पाहणार आहोत. ग्रामीण भागातील बर्‍याच लोकांच्या बोलण्यात आजही ह्या शब्दाचा वापर केला जातो. पण काळाच्या ओघात या शब्दांचा वापर आज कमी होताना दिसून येतो आहे.

Farming tools Names in Marathi – शेतीच्या अवजारांची मराठीत नावे –

  1. नांगर = शेताची नांगरणी करण्यासाठी वापरले जाणारे साधन “नांगर”.
  2. डवरा = शेताची डवरणी करण्यासाठी असलेले एक साधन. “डवरणी” शेती पिकातील गवत आणि माती पालटणीसाठी केली जाते. डवरणीमुळे पिकांचा पोत सुधारतो.
  3. तिफण = शेतात बियाणे पेरणीसाठी वापरले जाणारे साधन “तिफण”.
  4. गोफण = पाखरांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण “गोफण“.
  5. वखर = शेत नांगरणी केल्यावर वखरणी करण्यासाठी “वखर” या अवजाराचा वापर केला जातो.
  6. कुदळ / टिकास = “कुदळ / टिकास” या अवजाराचा वापर खोदकामासाठी करण्यात येतो.
  7. फावडे = खोदलेली माती भरण्यासाठी “फावड्याचा” वापर केला जातो.
  8. कुर्‍हाड = शेतातील पालवी किंवा लाकूड तोडण्याकरीता “कुर्‍हाड” उपयोगी पडते.
  9. रुमणे = वखर, डवरा, तिफण याचा दांडा किंवा मुठ. डवरा, वखर अथवा तीपण चालवताना त्यावर दाब देण्यासाठी, वखर, डवरा, तिफण उचलून दुसऱ्या तासात ठेवण्यासाठी “रुमणे” असते.
  10. फण = डवरा, वखर याच्या खालच्या भागास असलेले लाकडी “फण” . ज्याला लोखंडी पास बसवलेली असते.
  11. चर्‍हाट = लांब आणि जाड आकाराचा ताग, वाख, किंवा नायलाँनपासून तयार केलेला मोठा दोरखंड म्हणजे “चर्‍हाट“.
  12. डाले किंवा डालग = बांबू तासून त्याच्या पट्ट्या करुन त्यापासून डाले किंवा डालग तयार करण्यात येते. शेतीतील ज्वारी कणसे,कापूस, मिरची वाहून नेण्यासाठी “डाले” किंवा “डालग” याचा वापर केला जातो.
  13. शेणोडी = बांबू तासून त्याच्या पट्ट्या करुन त्यापासून “शेणोडी” तयार करण्यात येते. ग्रामीण भागात गोठ्यातील जनावरांचे शेण काढण्यासाठी याचा वापर केला जातो.
  14. खराटा = तुर पिकाच्या वाळलेल्या तुराट्याचा वापर “खराटा” बनवण्यासाठी करण्यात येतो. जनावरांचा गोठा किंवा घरासमोरील आंगण झाडून स्वच्छ करण्यासाठी खराट्याचा वापर केला जातो.
  15. इरताची काडी = डवरणी करतांना डवर्‍याच्या पासला चिकटलेली माती, गवत काढण्यासाठी “इरताची काडी” उपयोगी असते. इरताच्या काडीच्या बुडाला लोखंडी छोटी प्लेट लावलेली असते आणि काडीच्या वरच्या भागावर बारीक घुंगरू लावलेले असतात.
  16. कासरा = बैलाला बांधलेली लगाम दोरी म्हणजे “कासरा“. कासरा हा बैलाच्या वेसणींला धरुन बांधलेला असतो.
  17. आऊत /औत = नांगरणी, वखरणी किंवा डवरणी करीता वापरले जाते. “आऊत” किंवा “औत” चालवण्यासाठी बैलजोडीची आवश्यकता असते.
  18. बैलाचे मुस्के = झाडाच्या मुळाची साल काढून त्याचे वाख तयार केले जाते. या वाखाची दोरी करुन त्यापासून बैलासाठी “मुस्के” तयार करण्यात येते. डवरणी करतांना शेतातील उभ्या पिकाला बैलांनी तोंड लावू नये म्हणून “मुस्के” वापरले जाते.
  19. डवर्‍याची/वखराची पास = लोखंडापासून तयार केलेली “पास” डवर्‍याला लावलेली असते. शेती पिकातील गवत आणि माती पालटणीसाठी वापर.
  20. रानसावडी = पेरणी केलेल्या शेतात बियाणे उघडे राहणार नाही व ते मातीत चांगले झाकले जातील यासाठी औताला “रानसावडी” लावून शेत फिरवले जाते.
  21. विळा = पिक, गवत कापण्यासाठी, शेतात निंदण करण्यासाठी “विळा” वापरला जातो.
  22. शेंबी = इरताची काडी ही बांबूच्या भरीव काडीपासून तयार केली जाते. ही काडी फुटू नये यासाठी काडीला बसवलेली पितळेची अथवा तांब्याची लहान पट्टी म्हणजे “शेंबी” होय.
  23. कुश्या = लाकडी नांगराला फाळ म्हणून लावलेला असतो तो लोखंडी “कुश्या“. नांगरासाठी फाळ म्हणून आणि खोदकामाकरीता वापर.
  24. सरोता = बियाणे पेरणीसाठी वापरले जाणारे पोकळ बांबूचे नरसाळे. हाताच्या मुठीतून बियाणे या “सरोत्यात” सोडले जाते. सरोत्याच्या खालचा भागातून हे बियाणे मातीत रुजले जातात.
  25. जू = बैलाच्या मानेवर असलेले लाकडाचे “जू“, जोखड.

आणखी काही शब्द

टोबणी, लावणी, पेरणी, कापणी, मळणी, झोडपणी, वेचणी, छाटणी, आलीगेली, खुरपणी, उपणणी, निंदण, खुरपण, फवारणी, तोडणी, खुडणी,